InfiWorks, मुख्यपृष्ठ

CloudMess मागची कंपनी

इन्फिवर्क्स टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड ही 2026 मध्ये महाराष्ट्रात नोंदणी झालेली सॉफ्टवेअर कंपनी आहे. लहान व्यवसायांसाठी सोपं सॉफ्टवेअर आम्ही बनवतो; CloudMess हे आमचं पहिलं ॲप.

सुरुवात कशी झाली

“पुण्यात शिकताना रोजचं जेवण मेसचंच. कार्ड पंचिंग, वहीतल्या खुणा, हिशोबावरून वाद, उरलेलं अन्न — हे सगळं जवळून पाहिलं. म्हणून CloudMess बनवलं: मेस चालवणाऱ्यांसाठी, आणि तिथे जेवणाऱ्यांसाठी.”

सुजित कदम, संस्थापक

लहान व्यवसायांसाठी, साध्या फोनवर चालणारं, मराठी, हिंदी आणि English मधलं सॉफ्टवेअर बनवणं हे InfiWorks चं काम आहे. आम्ही पुण्यातील मेससोबत काम करतो, आणि सगळा सेटअप प्रत्यक्ष येऊन करतो.

कंपनीचे तपशील

नोंदणीकृत नाव
INFIWORKS TECHNOLOGIES PRIVATE LIMITED
CIN
U62090ME2026PTC476551
नोंदणीकृत कार्यालय
At 438, Shidod, Shidode, Bid, Beed – 431122, Maharashtra, India
आम्ही कुठे काम करतो
पुण्यातील मेससोबत
संस्थापक
सुजित कदम
प्रश्न आणि तक्रारी
सुजित कदम, contact@infiworks.co.in

हे तपशील कंपनी व्यवहार मंत्रालयाच्या वेबसाइटवर तपासता येतात: तिथे हा CIN शोधा. mca.gov.in

खरंच आम्ही आहोत, हे कसं ओळखायचं

  • आम्ही OTP, पासवर्ड किंवा UPI PIN कधीच मागत नाही.
  • CloudMess चं सदस्य ॲप फक्त Google Play वरूनच मिळतं.
  • मालकांचं ॲप, CM Owner, फक्त सेटअप भेटीत, तुमच्यासमोर इन्स्टॉल होतं. ते WhatsApp, SMS, ईमेल किंवा लिंकने कधीच पाठवलं जात नाही.
  • आमचा एकमेव सार्वजनिक नंबर +91 74834 01547 आहे, आणि ईमेल contact@infiworks.co.in.